Zobel की ज्याचा उच्चार झोबेल असा केला जातो; हा फ़िलीपीन्सचा प्रमुख चित्रकार मानला जातो. ज्या जोडगोळीवरुन SD बर्मन आणि RD बर्मन यांची आठवण व्हावी अशी ही पितापुत्रांची जोडगोळी आहे. त्यातील थोरला झोबेल हा प्रसिध्द चित्रकार होताच शिवाय त्याचा काही काळ हार्वर्ड विद्यापीठात गेलेला होता. अमेरिकन connection चा त्याला सांस्क्रुतिक व कलात्मक अशा दोन्ही प्रकारे फ़ायदा झालेला दिसतो.
थोरल्या झोबेल ची चित्रे (original) मला ayala अयाला म्युझियम मध्ये पहायला मिळाली. अतिशय रेघा युक्त जाळीदार असा मुक्तछंदाचा तो अविष्कार होता. खरेतर पहिल्यांदा मला पु लं च्या माडर्न आर्ट च्या comment ची आठवण झालीच; पण तसं म्हटलं तर त्यातील मिश्रपणा व गुंतागुंत हे दोन मुद्दे नंतर मला जाणवले.
धाकट्या झोबेल ने एका वेगळ्या प्रकारच्या कलेमध्ये आपले कौशल्य दाखवले. sand art photography असे त्याचे नाव आहे. वाळूच्या विविध व्यमिश्र आक्रुती – त्रिमिती नव्हे तर नुसती वाळू एकाच साध्या surface वर – आणि त्याचे विविध फ़ोटो असा हा कलाप्रकार आहे. परंतु त्यातील केवळ black and white शेडस मध्येही जी काही अप्रतिम रचना दिसते; ती केवळ डोळ्यांना मेजवानी आहे.
अयाला म्युझियम मध्ये इतर फ़ारसे कोणी चित्रकार दिसेनात तेव्हा भारतीय supremity बद्दल मला confidence वाटू लागला होता पण झोबेल लाच अर्पण केलेल्या एका पूर्ण दालनाने हा समज दूर केला. झोबेल, त्याची चित्रे, त्याचा पत्रव्यवहार, त्याचे लेखन साहित्य, त्याचा canvas, brush, stool, सगळे काही तेथे आहे. आत्ताच पाच मिनिटांसा्ठी झोबेल कुठेतरी बाहेर गेला आहे आणि कधीही आत येईल असा तो देखावा होता.
कधी शिकणार आहोत आपण? पु लं नी शेक्सपियरच्या गावाला भेट दिली त्याला ही आता तीस वर्षे झाली असतील. अजूनही एकाही व्यक्तीचे यथोचित स्मारक आपण उभे करु शकलो आहोत असे वाटत नाही. राजकीय पुढारी ते सांस्क्रुतिक legends पर्यंत एकही चांगले उदाहरण महाराष्ट्रात पटकन आठवत नाही. प्रीतीसंगम, कराड आणि गायकवाड वाडा, पुणे हे एक त्यातल्या त्यात् बरे उदाहरण. आणि श्री शिवाजी महाराज, कवी गदिमा, वसंतदादा पाटील ही अतिवाईट उदाहरणे. तारीख, गाव, ठिकाण आणि रचना या बाबतीत वाद घालणे ह जणू आपला छंद आहे. आणि सरकारातील लोकाना ही त्याची पूर्ण आवड आहे. असो.